राज्यात 25 जुलैपर्यंत बरसो रे ! या भागात असेल रेड अलर्ट | पुढारी

राज्यात 25 जुलैपर्यंत बरसो रे ! या भागात असेल रेड अलर्ट

पुणे : मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, घाटमाथा या भागांत 25 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार, तर मराठवाड्याच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थिती, तसेच आगामी 24 तासांत मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढील पाच दिवस राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपि यांनी दिली.

राज्याच्या विविध भागांत अलर्ट
रेड : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
ऑरेंज : पुणे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा,
यलो : नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला

Back to top button