पत्नीकडून पतीचा खून : मुलीने केला आईच्या कृत्याचा भांडाफोड

 खून
खून
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात पत्नीकडून पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

दिपक बलवीर सोनार (वय ३६, रा. ६०६ गुरुवार पेठ) असे मृत पतीचे नाव आहे. पत्नी राधिका दिपक सोनार (३४) हिने डोक्यात मारहाण करत गळा आवळून पतीचा खून केला.

अधिक वाचा :

हा सर्व प्रकार सुरू असताना, त्यांची दोन मुले देखील घरात होती. राधिकाने खूनाची माहिती कुणास दिली तर त्यांना चाकूने मारून टाकेल, अशी धमकी दिली होती.

मात्र, दिपकच्या अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीनेच आईच्या कृत्याचा भांडाभोड केला. आणि खूनाला वाचा फोडली.

याप्रकरणी, पोलिस उपनिरीक्षक राहूल घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राधिका दिपक सोनार (वय.34,रा. गुरुवार पेठ) या महिलेच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १२) रात्री दिपक सोनार हा मद्यप्राशन करून घरी आला होता.

त्यावेळी दिपक व राधिका या दोघांत भांडण झाले. राधिकाने दिपकला जेवणाचे ताट वाढले होते.

त्याने राधिकाच्या अंगावर ते फेकून दिले. त्यातूनच राधिकाने दिपकला ढकलून जमीनीवर खाली पाडले. त्यानंतर बॅटने डोक्यात मारून ओढनीने गळा आवळला.

त्यामध्ये दिपक हा बेशुद्ध पडला. यावेळी दोन्ही मुले घरात उपस्थित होती. राधिकाने त्यांना हा प्रकार कोणाला सांगितला तर चाकूने मारुण टाकण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्यांच्याच मदतीने दिपक याला ओढत -ओढत बाथरुममध्ये नेऊन, त्या ठिकाणी त्याच्या गळ्याला दोरीने बांधून खुट्टीला अडकवून ठेवून त्याचा खून केला.

अधिक वाचा :

आपण केलेल्या कृत्याचा पोलिस व इतरांना पत्ता लागू नये म्हणून राधिका तिच्या दोन्ही मुलांना घेऊन दोन दिवस बाहेर गेली.

दोन दिवसानंतर तिने परत आल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनानंतर घरच्यांच्या ताब्यात दिला होता. परंतु अंत्यसंस्काच्यावेळी मुलीने आईनेच बाबाला मारल्याचे इतर नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पुढील तपास गुन्हे निरीक्षक गाडे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news