

जोगेश्वरी (मुंबई) : पुढारी वृत्तसेवा : अंधेरी मधील फुटपाथवरील नाल्याच्या मॅनहोलमध्ये युवती पडली. अंधेरीमधील या प्रकाराने महानगरपालिकेचा सावळा कारभार पुन्हा एकदा समाेर आला आहे.
अधिक वाचा
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे येथील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. याच पाण्यातून वाट काढत असताना अंधेरी पश्चिम डीएननगर येथील मुख्य मार्गावर लगत असलेल्या फुटपाथवरील नाल्याच्या मॅनहोलमध्ये युवती पडली.
अधिक वाचा
यावेळी या नाल्याचे झाकण तुटले असल्यामुळे युवतीचा पाय त्यात अडकला गेला. या घटनेवरून महापालिकेचा सावळा कारभार नागरिंकाच्या निदर्शनास आला आहे.
अधिक वाचा
हा सर्व प्रकार येथील मुख्य मार्गावरील असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
पाहा : भात लावणीचं काम चालतं कसं ,चला पाहूया