जर्मनी : बेल्जियम आणि जर्मनीच्या पुरामध्ये ७० लोकांचा मृत्यूृ; अनेक जण बेपत्ता | पुढारी

जर्मनी : बेल्जियम आणि जर्मनीच्या पुरामध्ये ७० लोकांचा मृत्यूृ; अनेक जण बेपत्ता

बेल्जियम, पुढारी ऑनलाईन : जर्मनी देशात अतिवृष्टीमुळे महापुर आलेला आहे. या पुरात गाड्या, घरे वाहून जात आहे. आतापर्यंत ७० हून जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

जर्मनीमध्ये काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. कालव्याच्या पाण्याने पात्र सोडल्यामुळे रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे रस्त्यामुळे नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठमोठ्या इमारती आणि गाड्या त्यातून वाहताना दिसत आहेत.

बेल्जियमध्येदेखील या पुरामुळे ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोबलेन्झ शहरातील पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली. या पुरामध्ये नागरिक घराच्या छतावर अडकून बसले आहेत.

घरावर अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू आहेत. शुल्ड गावात ६ घरे कोसळली आहेत. तर काही नागरिक बेपत्ता आहेत. अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. या पुरात किती नुकसान झाले आहे, अजूनही कळू शकलेलं नाही.

जर्मनी देशात आलेल्या पुराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये घरे कासळत आहेत. तर, गाड्या वाहताना दिसत आहेत. जर्मनीसहीत शेजारील राष्ट्राचेही नुकसान झालेले आहेत. जर्मनीतील या पुराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये पत्तांचे बंगल्यासारखे इमारती कोसळत आहेत.  घरांच्या छतावरून पाणी जात आहे.

पहा व्हिडीओ : कोरोना आणि आरोग्य…

हे वाचलंत का? 

Back to top button