हेलिकॉप्टर कोसळले : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, १ ठार | पुढारी

हेलिकॉप्टर कोसळले : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, १ ठार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : वड्री (चोपडा तालुका) येथे हेलिकॉप्टर कोसळले. ही मोठी दुर्घटना आज (दि. १६) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकवस्ती पासून दूर एका शेतात हेलिकॉप्टर कोसळले. यात दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक वाचा :

अपघाताची माहिती समजताच तहसीलदार चोपडा व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच मदत व बचाव कार्य सुरू आहे.

अधिक वाचा :

Back to top button