महाबळेश्वर सह राज्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी २५० कोटी : ना. अजित पवार

महाबळेश्वर सह राज्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी २५० कोटी : ना. अजित पवार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर सह राज्यातील एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी गुरुवारी दिले.

राज्यातील पर्यटनद़ृष्ट्या महत्त्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा पर्यटन अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यासही पवार यांनी मान्यता दिली.

जिल्ह्यातील पर्यटन विकासात खासगी संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये पर्यटन सोसायटी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील पर्यटन विकासाच्या प्रकल्पांचा आढावा आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही विशेष बैठक झाली.

या बैठकीत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 25 टक्के निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्याबरोबरच पर्यटन विकासाची शंभर टक्के पूर्ण झालेल्या कामांची 72 कोटींची देयके अदा करण्यात यावीत,

जिल्हा पर्यटन अधिकार्‍यांची प्रायोगिक तत्त्वावर आणि कंत्राटीपद्धतीने नियुक्ती करताना अ‍ॅग्रो टूरिझमच्याक्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांचा विचार व्हावा, असेही ठरवण्यात आले.

या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news