परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी थकबाकी प्रकरणी थकीत रक्कम वसुली करण्याच्या संदर्भाने ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने बँक खाते सील केले असल्याची माहिती आहे. मात्र वैद्यनाथ साखर कारखाना परळीने कोणतेही बँक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याने स्पष्टीकरण दिले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.
अधिक वाचा :
पीएफची रक्कम थकल्यामुळे ईपीएफओच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे.
पीएफचे एक कोटी ४६ लाख रुपये थकलेले होते. ईपीएफओच्या वतीने ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
शिल्लक थकबाकी घ्या वसुलीसाठी कारखान्याचे खाते सील (होल्ड) करण्यात आले. थकबाकी वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे.
अधिक वाचा :
दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या
असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा :
दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा
प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे.
कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :