पुणे आयसर प्रयोगशाळा : संस्थेच्या आवारातील इमारतीतील आग | पुढारी

पुणे आयसर प्रयोगशाळा : संस्थेच्या आवारातील इमारतीतील आग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आयसर प्रयोगशाळा संस्थेच्या आवारात दुर्घटना घडली. पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षा व अनुसंधान संस्थेच्या (आयसर) संस्थेच्या आवारातील इमारतीतील प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपारी आग लागली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासात आग नियंत्रणात आणत चार वाजता ही आग पुर्णपणे विझवली.

आग लागल्यानंतर प्रयोगशाळेतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्याने गंभीर स्वरुपाची दुर्घटना टळली.

अधिक वाचा :

आयसर ही एक वैद्यानीक संशोधन संस्था आहे. संस्थेच्या एका इमारतीतील प्रयोगशाळेतून दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धूर येत होता.

याबाबतची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रयोगशाळेतून मोठ्याप्रमाणावर आगीचे लोट बाहेर पडत होते.

अधिक वाचा :

अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, गजानन पाथ्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत प्रयोगशाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे.

आग लागल्यानंतर प्रयोगशाळेतील कर्मचारी तातडीने बाहेर पळल्याने गंभीर दुर्घटना टळली.

अधिक वाचा :

आग आटोक्यात आल्यानंतरही सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचा बंब आणि जवान तेथे थांबले होते.

2 वाजून 36 मिनिटांनी आग नियंत्रणात आल्यानंतर 4 वाजता ही आग पुर्णपणे विझविण्यात आली. आग पूर्णपणे विझल्याची खात्री पटल्यानंतर जवान संस्थेच्या आवारातून बाहेर पडले.

आगीमागचे कारण समजू शकले नाही.

दुपारी 12 वाजून अकरा मिनिटांनी ही आग लागली होती. यामध्ये अग्निशमन जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझविताना साहित्य बाजूला काढताना दोन जवान किरकोळ जखमी झाले. दहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
– प्रशांत रणपिसे, पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख

Back to top button