सावधान! लस दिल्यानंतर मुलांना ताप आला तर 'ही' गोळी देऊ नका, वाढू शकतो त्रास - पुढारी

सावधान! लस दिल्यानंतर मुलांना ताप आला तर 'ही' गोळी देऊ नका, वाढू शकतो त्रास

पुढारी ऑनलाईन: 3 जानेवारी 2022 पासून भारतात 15-18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कोविड लसीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जे पालक कोरोनापासून बचावासाठी मुलांच्या लसीची आतुरतेने वाट पाहत होते त्या पालकांनी या निर्णयामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. भारत बायोटेक निर्मित ‘कोवॅक्सीन’ ही लस मुलांना दिली जात आहे. जेव्हा प्रौढांचे लसीकरण सुरू झाले, तेव्हा बहुतेक लोकांना ताप, हातपाय आणि अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा यासारखे साईड इफेक्ट्स लसीकरणानंतर जाणवले.

कोल्हापूर जिल्हा बँक : जवळच्यांनी माझा ठरवून कार्यक्रम केला, पण मी त्यांचं पांग फेडणार : प्रकाश आवाडे

यामुळे काही लोक लस दिल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा पेनकिलर औषधे घेतात. म्हणूनच प्रत्येक पालकाला हे जाणून घ्यायचे आहे की, लस दिल्यानंतर मुलांवर काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात का. मात्र याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लस देण्यापूर्वी किंवा नंतर वेदनाशामक औषधांचे सेवन करू नये. कारण ही औषधे अनेक प्रकारे लसीचा प्रभाव कमी करू शकतात. हैदराबादस्थित लस निर्माता भारत बायोटेकने म्हटले आहे की, किशोरवयीन मुलांनी कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा वेदनाशामक औषध घेणे टाळावे.

उत्पल पर्रीकर यांनी हिंमत दाखवायला हवी, संजय राऊत यांनी दिली मोठी ऑफर

मुलांवर कोवॅक्सीनचे साईड इफेक्ट्स

प्रौढांप्रमाणे मुलांना देखील लसीकरणानंतर काही किरकोळ साईड इफेक्ट्स जाणवत आहेत जसे की ताप, डोकेदुखी , अस्वस्थता, इंजेक्शननंतर वेदना, अशक्तपणा आणि थकवा इ. इंजेक्शननंतर हातामध्ये वेदना कायम राहिल्यास, वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शनच्या जागेवर स्वच्छ, थंड कापड किंवा बर्फ लावला जाऊ शकतो.

याशिवाय थोडा हलका व्यायाम केल्यानेही आराम मिळू शकतो. मात्र, पालकांनी मुलाच्या वागण्यात बदल किंवा काही नवीन लक्षणांकडे लक्ष द्यावे. काही वेगळी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय मुलांना भरपूर पाणी पिण्याचा आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो आहे. ज्यामध्ये भाज्या, व्हिटॅमिन सी, भरपूर फळे, हळद, लसूण इ. समावेश आहे. यासोबतच 7-8 तासांची चांगली झोप घेणे गरजेचे आहे, जेणेकरून शरीराला आराम मिळेल. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुलांनी मास्क घालावे, हाताची स्वच्छता करावी आणि सामाजिक अंतर पाळावे.

जळगाव, पुण्यात मराठा विद्याप्रसारक संस्थेशी संबंधित गुन्ह्यात छापेमारी

भारत बायोटेकचे अधिकृत स्टेटमेंट

भारतातील हैदराबाद-स्थित लस निर्माता “भारत बायोटेक” ने अलीकडेच त्यांचे अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे. त्यामध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लस दिल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा वेदनाशामक औषध घेण्याची गरज नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकृत निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “आमच्या क्लिनिकल चाचण्यांदरम्यान, अंदाजे 30,000 व्यक्तींची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी सुमारे 10 ते 20 टक्के व्यक्तींनी साईड इफेक्ट्सबद्दल आम्हाला सांगितले . तथापि, यापैकी बहुतेक साईड इफेक्ट्स हे सौम्य स्वरूपाचे आहेत आणि ते 1 ते 2 दिवसात बरे होतात. त्यासाठी कोणतेही औषध घेण्याची गरज नाही.

पॅरासिटामॉल किंवा वेदनाशामक औषधे घेऊ नका

भारत बायोटेकने आपल्या अधिकृत निवेदनात असेही म्हटले आहे की “आम्हाला माहिती प्राप्त झाली आहे की, काही लस केंद्रे कोवॅक्सिन लस दिल्यानंतर मुलांना 500 मिलीग्राम पॅरासिटामॉलच्या तीन गोळ्या घेण्यास सांगत होती.” पॅरासिटामॉल घेण्याची शिफारस ही इतर कोविड -19 लसींसाठी आहे. पॅरासिटामॉलची शिफारस कोवॅक्सीन लसीसाठी केलेली नाही.” लस घेणाऱ्या मुलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्यांच्या शिफारशीनुसार पॅरासिटामॉल घेण्याची शिफारस कंपनीच्या निवेदनात करण्यात आली आहे.

मोठा निर्णय: आता कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना वाहनांना फी नाही, पुण्यात काय होणार?

डॉक्टर काय म्हणतात

या संदर्भात काही डॉक्टर सांगतात की, “कोणतीही कोरोना लस घेण्यापूर्वी आणि नंतर पॅरासिटामॉलची प्रोफिलैक्सिस म्हणून शिफारस केली जात नाही. लसीकरणापूर्वी किंवा नंतर वेदनाशामक औषधे वापरू नये, कारण ही औषधे लसीची प्रभावीता कमी करू शकतात. तथापि, लसीकरणानंतर 2-3 दिवस ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, इंजेक्शनच्या जागेवर वेदना होणे हे सामान्य आहे, जे सहसा कोणत्याही औषधाशिवाय बरे होते. त्यामुळे पॅरासिटामॉल हे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावे.

Back to top button