मोठा निर्णय: आता कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना वाहनांना फी नाही, पुण्यात काय होणार? - पुढारी

मोठा निर्णय: आता कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना वाहनांना फी नाही, पुण्यात काय होणार?

पुढारी ऑनलाईन: सर्वसामान्य वाहनधारकांना संरक्षण मंत्रालयाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना देशभरातील चारचाकी वाहनांना द्यावी लागणारी फी रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. हा निर्णय आगामी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाब मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे.

निवडणुका, मद्यालये चालतात मग शाळा का नाही? पालकांमधून संताप

देशात एकूण 62 कॅन्टोन्मेंट वेगवेगळ्या भागात असून त्यातील बहुतांश कॅन्टोन्मेंट हे उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधे आहेत. अनेकदा या कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून वसूल केला जाणारा टोल हा वादाचा विषय बनतो.

Defense Ministry and Cantonments

capricorn वार्षिक राशिभविष्य 2022 मकर : सुसंधी लाभेल

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट अशी तीन कॅन्टोन्मेंट असून देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर प्रवास करताना द्यावा लागणारा टोल आजपासून द्यावा लागणार नाही. देहूरोड आणि खडकी येथील फी बंद झाली असली तरी, पुणे कॅन्टोन्मेंट रोड टॅक्सच्या नावाखाली वाहन चालकांकडून पैसै गोळा करत असल्याने पुणे कॅन्टोन्मेंटमधून प्रवास करणाऱ्या वाहनांना तूर्तास तरी या टोलमधून सूट मिळणार नाही.

हेही वाचा:

सातारा : दिवसा जमावबंदी; रात्री संचारबंदी

विराट कोहलीला तिसर्‍या कसोटीत द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी

Back to top button