उत्पल पर्रीकर यांनी हिंमत दाखवायला हवी, संजय राऊत यांनी दिली मोठी ऑफर | पुढारी

उत्पल पर्रीकर यांनी हिंमत दाखवायला हवी, संजय राऊत यांनी दिली मोठी ऑफर

पुढारी ऑनलाईन डेस्क

गोव्यात शिवसेनेचा (shivsena) साधा सरपंचही नाही. अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister of Goa Pramod Sawant) यांनी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, कधी एके काळी गोव्यात भाजपचा सरपंच काय पंचही नव्हता. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष फोडला आणि ते निवडून येऊ लागले, अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला होता. आता पुन्हा राऊत यांनी, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्यावर निशाणा साधलाय. प्रमोद सावंत जमिनीवरून चार हात वर चालतात, अशी टिपण्णी त्यांनी केली आहे.

गोव्यात निवडणुकीआधी काँग्रेस सोबत युती करण्याचे प्रयत्न केले. पण काँग्रेस गोव्यात स्वबळावर लढण्यावर ठाम असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्याबाबतही राऊत यांनी वक्तव्य केले आहे. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी भाजप पक्ष गोव्यात रुजविला. राजकारणात काही निर्णय धाडसाने घ्यायला हवेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.

पर्रीकरांच्या कुटुंबानं शिवसेनेशी संबध जोडला तर शिवसेना ताकद पणाला लावायला तयार आहे, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात बाबूश मोन्सेरात हेच भाजपचे उमेदवार असतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पणजी मतदारसंघातून आतानासिओ मोन्सेरात उर्फ बाबूश यांना उमेदवारी जाहीर करण्याची घाई चालवली आहे. असे असले तरी राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पातळीवर माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी देण्याविषयी विचार सुरू झाला असल्याचे समजते.

हेही वाचलं का?

पहा व्हिडिओ : मोराने दोस्ती शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही | Peacock viral video

Back to top button