Video: नोरा फतेहीला शाळेतील मुलगा देतोय टक्कर; दिलबर-दिलबर’ गाण्यावरील डान्स पाहून सगळेच हैराण | पुढारी

Video: नोरा फतेहीला शाळेतील मुलगा देतोय टक्कर; दिलबर-दिलबर' गाण्यावरील डान्स पाहून सगळेच हैराण

पुढारी ऑनलाईन: शाळेतील मुलांचे नृत्य आणि गाण्याचे व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हिडिओंमध्ये मुलांमध्ये असलेले अप्रतिम टॅलेंट आपणाला पाहायला मिळत असते. ते आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकतात. एका सरकारी शाळेतील मुलाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलगा नोरा फतेहीच्या गाण्यावर अप्रतिम डान्स करत आहे. लोक हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत.

Gold Rate in 2022 : नवीन वर्षात सोने चमकणार, काय असेल दर!

छत्तीसगडच्या सरकारी शाळेतील व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ छत्तीसगडमधील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा आहे. यामध्ये शाळेच्या मैदानात मुले उभी आहेत. दरम्यान, एक मुलगा गर्दीपासून दूर उभा असल्याचे दिसते. तो स्काय ब्लू शर्ट आणि निळी पँट घालून उभा आहे. त्याने डोक्यावर टोपीही घातली आहे. अचानक नोरा फतेहीचे ‘दिलबर-दिलबर’ गाणे तेथे वाजू लागते. गाणे वाजताच मुलगा नाचू लागतो. तो मुलगा ज्या पद्धतीने डान्स करतो ते पाहून तो प्रोफेशनल डान्सर असल्यासारखे वाटते.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी डॉ. नवज्योत सिमी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, छत्तीसगडमधील सरकारी शाळेतील मुलाची प्रतिभा. या व्हिडीओमध्ये तो मुलगा प्रत्येक स्टेप छान करतो. लोक त्याच्या टॅलेंटला सोशल मीडियावर खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 2 लाख वेळा पाहिला गेला आहे.

हेही वाचा:

Hero Lectro : देशातील पहिली ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टेड हिरो ई-सायकल लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

नाशिक : दोन अननस विक्रेत्यांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या ऊस रस विक्रेत्याचा खून

Back to top button