Hero Lectro : देशातील पहिली ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टेड हिरो ई-सायकल लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या | पुढारी

Hero Lectro : देशातील पहिली ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टेड हिरो ई-सायकल लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिरोने इलेक्ट्रिक बाईक्ससोबत इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे. दरम्यान, हिरो सायकल्सने इलेक्ट्रिक सायकल विभागात HERO LECTRO ने दोन नवीन इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणल्या आहेत. Electric Mountain Bicycles (इलेक्ट्रिक माउंटेन सायकल) (MTBs) F2i आणि F3i हे मॉडेल्स लाँच केले आहेत. यामध्ये F2i ची किंमत ३९९९९ तर F3i ची किंमत ४०९९९ असणार आहे.

कंपनीकडून शहरात आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी सायकलिस्टना आरामदायक वाटेल अशीच सायकल बाजारात आणली आहे. या सायकल्समध्ये आरामदायक रायडिंग एक्सीरियंस असल्याने ग्राहकांना सायकल पळवताना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. कंपनीकडून तरूणांना आकर्षित करण्यासाठी ही सायकल बनवली असल्याचे सांगण्यात आले आहे.

HERO LECTRO : सायकलची वैशिष्ट्ये

हिरो इलेक्ट्रिकची ई-एमटीबी ही माउंटन-बाइकिंग सेगमेंटमधील देशातील पहिली कनेक्टेड ई-सायकल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ब्लूटूथ आणि स्मार्टफोन अॅप कनेक्टिव्हिटीसह या सायकलला अनेक फिचर्स देण्यात आले आहेत, यामुळे रायडर्सना आपण किती सायकल पळवली त्याचा डेटा ठेवता येणार आहे. तसेच या सायकलला ऑटोलॉकचीही सुविधा देण्यात आली आहे.

HERO LECTRO : दोन्ही सायकल्स एका चार्जिंगमध्ये ३५ किमी धावते

Hero F2i आणि Hero F3i दोन्ही पूर्ण चार्ज केल्यावर ३५ किमी पर्यंतची रेंज पार करू शकते. या सायकलमध्ये ७ स्पीड गेअर सिस्टीम असणार आहे. तसेच २७.५ इंच उंची १०० मिमी सस्पेंशन, तर २९ इंच सायकल रिम्स आणि ड्युयल डिस्क ब्रेकसिस्टीमही या सायकल्सना देण्यात आली आहेत.

दरम्यान, SAWAR Hero Lectro चे CEO आदित्य मुंजाळ म्हणाले की, F2i आणि F3i ही MTB श्रेणीतील भारतातील पहिली कनेक्टेड ई-सायकल आहे. आम्ही Hero Lectro सायकल्स बाजारात आणताना आम्हाला वेगळा आनंद वाटत आहे. कमी पैशात चांगली सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

ड्रायव्हिंग मोड

दोन्ही माउंटन ई-बाईकमध्ये उच्च क्षमतेच्या 6.4Ah IP67 रेटेड वॉटर आणि डस्ट फ्री बॅटरीज असणार आहेत, या सायकल्स 250W BLDC मोटरमधून उच्च टॉर्क निर्माण करणाऱ्या आहेत. यामध्ये, रायडर्सना चार मोडमध्ये ऑपरेट करता येणार आहेत. ३५ किमीच्या रेंजमध्ये आपल्याला या मोडचा वापर होणार आहे. थ्रॉटल, क्रूझ कंट्रोल आणि मॅन्युअल असे मोड असणार आहे. दरम्यान या सायकलमध्ये एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यातून आपण एका मोडमधून दुसऱ्या मोडवर स्विच करू शकतो.

कशी खरेदी कराल?

Hero F2i आणि Hero F3i इलेक्ट्रिक-MTB Hero Lectro च्या ६०० हून अधिक डीलर्सचे नेटवर्क, चेन्नई आणि कोलकाता येथील ब्रँडची खास विभाग आणि झोन ऑनलाइन वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

Back to top button