मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प | पुढारी

मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध रेल्वे स्थानकात पाणी भरल्याने रविवार पहाटेपासून मुंबई येथील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

मुसळधार पावसामुळे मुंबई येथी गाड्या स्थानकात अडकून पडल्या आहेत. तर, काही गाड्या रद्द करण्यात आल्या. परिमाणी प्रवासाचे गैससोय होत आहे.

मध्य रेल्वेच्या दादर, परेल, सायन, कुर्ला, भांडुप  स्थानकात पाणी भरल्याने सिएसएमटी ते ठाणे दरम्यानची लोकल वाहतूक बंद झाली. प्रवासाच्या सोयीसाठी ठाणे ते कल्याण लोकल धावत आहे.

Mumbai Local news
पावसामुळे मध्य, हार्बर,पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

हार्बर मार्गवर वडाळा, चुनाभट्टी, टिळक नगर, कुर्ला स्थानकात  रेल्वे रुळावर पाणी आल्याने  सिएसएमटी ते वाशी, गोरेगाव लोकल बंद आहे. वाशी ते पनवेल लोकल सुरु आहेत.

यामुळे मुंबईत येणाऱ्या  गडग, नागपूर, सोलापूर, हुबळी, पंढरपूर जालना, मनमाड एक्सप्रेस कल्याण, पुणे, इगतपुरी, नाशिक स्थानकांपर्यंतच चालविण्यात आल्या. तर पुणे ते मुंबई दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवर प्रभादेवी ते दादर, विरार ते नालासोपारा दरम्यान पाणी भरल्याने वाहतूकिचे तीन तेरा वाजले आहेत. पहाटेपासूनच अप आणि डाउन धीमी लाईन बंद झाली.

सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर सकाळी  ६.४० वाजता चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची धीमी वाहतूक सुरू  झाली.

चेंबूरमध्ये दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

चेंबूरमध्ये दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

चेंबूर येथील भारत नगरमध्ये दरड कोसळली. यामुळे घराची भिंत पडली. मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

पहा व्हिडीओ : चला पाहुया नाशिकच्या लेण्या आणि किल्ला

हे ही वाचलंत का? 

Back to top button