अ‍ॅनिमियाची स्मार्टफोननेही होऊ शकते चाचणी! | पुढारी

अ‍ॅनिमियाची स्मार्टफोननेही होऊ शकते चाचणी!

न्यूयॉर्क : अ‍ॅनिमिया ची स्मार्टफोननेही होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. चाचणी स्मार्टफोनने सेल्फी टिपणे किंवा इतरांची छायाचित्रे टिपणे अनेकांच्या आवडीचे काम असते. आता स्मार्टफोनमधील ही सुविधा अ‍ॅनिमिया म्हणजेच शरीरातील रक्ताच्या कमतरतेच्या समस्येचेही निदान करू शकते. संशोधकांनी म्हटले आहे की स्मार्टफोनच्या मदतीने डोळ्यांच्या सर्वात खालच्या भागाचे छायाचित्र टिपून अ‍ॅनिमियाचे निदान करता येते.

संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) असलेले एक असे मॉडेल तयार केले आहे जे डोळ्यांमधील खालील व पापण्यांच्या आतील भागाच्या फोटोचे विश्लेषण करते. तपासणीनंतर माणूस अ‍ॅनिमियाने ग्रस्त आहे की नाही हे त्यामधून समजू शकते. ब—ाऊन युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील र्‍होड आयलंड हॉस्पिटलच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ज्या तंत्राने या फोटोची तपासणी केली जाते त्याला एखाद्या अ‍ॅपमध्येही रुपांतरीत करता येऊ शकते.

तसे झाले तर माणूस आपल्या डोळ्यांच्या खालील भागाचा फोटो टिपून व अशा अ‍ॅपवर तो अपलोड करून अ‍ॅनिमियाशी संबंधित चाचणी करू शकतो. हे अ‍ॅप फोटोचे विश्लेषण करून अ‍ॅनिमियावर रिपोर्ट देईल. ही पद्धत सर्वांसाठी उपलब्ध झाल्यावर अ‍ॅनिमियासाठी रक्तचाचणी घेण्याची गरज राहणार नाही.

ज्यावेळी शरीरात लाल रक्तपेशींची संख्या कमी होते त्यावेळी अ‍ॅनिमियाची स्थिती निर्माण होते. लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते जे ऑक्सिजनचा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना पुरवठा करण्याचे काम करते. शरीरात हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्वचा पिवळी दिसू लागते. हेच अ‍ॅनिमियाचे सर्वात मोठे लक्षण असते. जगभरातील 25 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या अ‍ॅनिमियाशी झुंजत आहे.

Back to top button