इमोजीची भाषा ठरतेय अधिक प्रभावी!

शिगेताका कुरीता
शिगेताका कुरीता
Published on
Updated on

लंडन : इमोजीची भाषा अधिक प्रभावी ठरत आहे. माणूस शब्दांविनाही संवाद करू शकतो. हृदयाची, डोळ्यांची भाषा अशा भावनिक संवादाचा आधार असते. आधुनिक काळात इमोजीची भाषाही असाच शब्दांविना संवाद करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. रोज एक हजार कोटी वेळा हे इमोजी पाठवले जात असतात.

शनिवारी 'जागतिक इमोजी दिन' साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना चिमुकल्या चित्रांद्वारे प्रकट करणार्‍या या इमोजींविषयी अनेकांना कुतुहल निर्माण झाले. 1990 मध्ये जपानी टेलिकॉम कंपनी 'डोकोमो'ने टेक्स्ट मेसेजमध्ये इमोजीची सुविधा दिली. 'डोकोमो'चे कर्मचारी शिगेताका कुरीता यांनी जगातील पहिला इमोजी बनवला होता.

25 वर्षांचे इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असलेल्या शिगेताका यांनी 176 इमोजींचा एक सेट बनवला. जपानी शब्दकोषात 1997 मध्ये 'इमोजी'ला समाविष्ट करण्यात आले. एकूण 176 आयकॉनपासून सुरू झालेली ही इमोजीची भाषा आता 3353 इमोजींपर्यंत पोहोचली आहे. 'व्हिज्युअल लँग्वेज' म्हणजेच द़ृश्य भाषेच्या रूपात वापरल्या जाणार्‍या प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपीलाही इमोजींच्या भाषेने मागे टाकले आहे.

बि—टनच्या बांगोर विद्यापीठातील भाषाविज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या व्यव इवान्स यांनी म्हटले आहे की इमोजी ही मानवी इतिहासातील सर्वात वेगाने प्रसार होणारी भाषा आहे. दर सेकंदाला सुमारे 35 लाख इमोजी मेसेंजरवर पाठवले जातात. एकट्या फेसबुकवरच 70 कोटी इमोजी पोस्ट केल्या जातात.

ट्विटरवर गेल्या पाच वर्षांमध्ये इमोजीचा वापर 40 टक्के वाढला आहे. 'इमोजी' हा जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ 'पिक्चर कॅरेक्टर'. 'इ' म्हणजे पिक्चर आणि 'मोजी' म्हणजे 'कॅरेक्टर'. 2013 मध्ये 'इमोजी' हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट झाला आणि 2015 मध्ये 'इमोजी' ऑक्सफर्ड डिक्शनरीचा 'वर्ड ऑफ द इअर' बनला!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news