अमरावती : मेळघाट सीमेवरील अवैध शस्त्र निर्मिती कारखाना उध्वस्त; ३५ पिस्तूल जप्त | पुढारी

अमरावती : मेळघाट सीमेवरील अवैध शस्त्र निर्मिती कारखाना उध्वस्त; ३५ पिस्तूल जप्त

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सीमेवर मध्यप्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध शस्त्र निर्मिती कारखाना उध्वस्त केला आहे. येथून जवळपास साडेपाच लाखाच्या ३५ पिस्तूल पोलिसांनी जप्त केल्या. जपानी बनावटीच्या हुबेहूब पिस्तुली येथे तयार केल्या जात होत्या.

बुधवारी (दि.१) मध्य प्रदेशातील पाचोरी गावाजवळच्या जंगलातील अवैध शस्त्रसाठा निर्मिती कारखान्यावर मध्यप्रदेशच्या नेपानगर पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट सीमेवर मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई करत अवैध शस्त्र कारखाना उध्वस्त केला. आधी १५ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या आधारावरच खकणार व नेपानगर पोलिसांनी पिस्तूली बनविण्याच्या साहित्यासह आणखी २० पिस्तूल जप्त केल्या आहेत. राजपाल जुनेजा अस अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकल्यानंतर पिस्तुली, अवजारे, मोबाईल जप्त केले. दरम्यान दोन संशयित घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button