‘कैसरगंज’मधून भाजप बृजभूषण शरण सिंहांचा पत्ता करणार कट? | पुढारी

'कैसरगंज'मधून भाजप बृजभूषण शरण सिंहांचा पत्ता करणार कट?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोपामुळे देशभरात चर्चेत आलेले भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना भाजप उमेदवारी नागरण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यांच्‍या जागी त्‍यांचा मुलगा करण भूषण सिंह याला कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्‍याची शक्‍यता आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.

भाजपमधील वरिष्‍ठ नेत्‍यांनी कैसरगंजमधील उमेदवारीवरुन बृजभूषण सिंहांशी फोनवर चर्चा केली. लैंगिक शोषणाचा त्‍यांच्‍यावर असणार्‍या आरोपांमुळे यंदाच्‍या निवडणुकीत त्‍यांच्‍या ऐवजी त्यांचा मुलगा करण भूषण सिंग यांना लोकसभेचे तिकीट दिले जाऊ शकते.
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषणाचे आरोप

देशातील नामांकित कुस्तीपटूंनी कैसरगंज येथील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी त्‍यांच्‍यावर गुन्‍हाही दाखल झाला होता. त्‍यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, नंतर कुस्ती महासंघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी बृजभूषण यांच्‍या निकटवर्तींची कुस्‍ती महासंघाच्‍या अध्यक्षपद वर्णी लागवण्‍यात आली. यानंतरही बराच गदारोळ झाला होता.

हेही वाचा : 

 

Back to top button