धुळे : वाढत्या उष्णतेचा तडाखा सहन होत नाही, शाळांना सुट्टी जाहीर करा – भाजपा प्रणित शिक्षक आघाडीची मागणी | पुढारी

धुळे : वाढत्या उष्णतेचा तडाखा सहन होत नाही, शाळांना सुट्टी जाहीर करा - भाजपा प्रणित शिक्षक आघाडीची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात उष्णतेची लाट आल्याने उष्णतेचा पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. त्यामुळे राज्यतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माथ्यमिक शाळेतील विद्यार्थांना सुट्टी घोषित करून शिक्षकांसाठी वर्क फ्रॉम होम घोषित करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडी नाशिक विभाग संयोजक महेश मुळे यांनी शिक्षण आयुक्त यांच्याकडे केली आहे.

यावर्षी उष्णतेची प्रचंड लाट आली असून यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने सकाळ सत्रात कामकाज पत्र काढले आहे. सदर पत्रास अनेक शाळांनी केराची टोपली दाखवून कुचकामी ठरवले आहे. काही शाळा या दुपारून वर्ग भरवून दहावी व बारावी विद्यार्थाचे जादाचे तास घेत आहेत. यामुळे विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनी यांना प्रंचड उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रचंड उष्णतेमुळे मुलांबरोबर शिक्षक सुद्धा तापाच्या साथीने हैराण झाले आहेत. विद्यार्थी व शिक्षक हे उष्माघाताचे बळी ठरल्यास याला जबाबदार शालेय प्रशासन हे राहील.

राज्यातील विद्यार्थांचे शालेय परिक्षेचे कामकाज संपत आले आहे. विद्यार्थाना 15 जुन पर्यत सुट्टी जाहीर करून शिक्षकांना वार्षिक निकालाच्या कामकाजासाठी वर्क फ्रॉम होमचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून दिले जावेत. तसेच शाळामध्ये पहिली ते आठवीच्या वर्गासाठी सुरू असलेला शालेय पोषण आहार वाटपात बदल करून कोरडा शिधा विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत पोहोचावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी संयोजक महेश मुळे ,प्रदेश सदस्य प्र.ह दलाल, डाॅ नितीन कापडीस, धुळे महानगर संयोजक मनोहर चौधरी, विश्वासराव देवरे जिल्हा सह संयोजक,जितेंद्र कागणे, अविनाश पाटील, आनंद पाटील, काशिनाथ माळी, संदीप सोनवणे, योगेश देवरे, शिवदास भामरे, देवेंद्र गिरासे, कैलास माळी जयेश कोर ,कमलेशकुमार भदाणे, अजय शिरुडकर, भुपेंद्र मालपुरे, अमित गोराणे, संजय पाटील, प्रविण बाविस्कर, संजय नेरकर, हितेंद्र परमार, मनोज सोनार, रेखा बारी, रोहिणी मुळे, सोनाली सिसोदिया, अपर्णा पाटील,अमोल शिंदे, कैलास पाटील, विनोद जैन, इंद्रसिंग जमादार, राजेंद्र बडगुजर,, रविंद्र टाकणे, प्रशांत पालवे आदींनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button