शरद पवारांची मोठी घोषणा | दिंडोरीची जागा आम्ही लढवणार तर नाशिकची… | पुढारी

शरद पवारांची मोठी घोषणा | दिंडोरीची जागा आम्ही लढवणार तर नाशिकची...

पुढारी ऑनलाइन डेस्क – बहुतेक 3 ते 4 दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. हा माझा अंदाज आहे, 18, 19, 20 या दोन-तीन दिवसांत आचारसंहिता लागेल. दिवस कमी आहे. त्यामुळे जास्तीतजास्त ठिकाणी जाणार आहे. माझा पक्ष आणि ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस सह घटक पक्ष यांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गट लढविणार आहे. तसेच दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लढविणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे.

काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आज शरद पवार यांच्या घोषणेने काहीसे चित्र स्पष्ट झाले आहे.  शरद पवार हे राहुल गांधी यांत्र्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी नाशिकमध्ये आले आहेत. दरम्यान त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, कुणी किती जागा लढवायच्या हे ठरलं आहे. 3 ते 4 जागा बाकी आहेत. त्यात प्रकाश आंबेडकर यांना काही जागा द्यायचे ठरले आहे. ते सहभागी झाल्यास त्यांच्या पक्षाला सुद्धा काही जागा देऊन एकत्रित निवडणूक असे डोक्यात आहे. त्याआधीच आम्ही काम सुरु केले आहे.

उद्धव ठाकरे सभा घेतील, मी सभा घेत आहे, वेळ मर्यादित असल्यानं आम्ही सर्व कामाला लागलो आहे. लोकांचा कौल महाविकास आघाडीकडे आहे असे दिसत आहे. सत्ताधारी पक्षावर शेतकऱ्यांची नाराजी दिसते. नाशिक जिल्हा आणि धुळे पुणे सातारा या भागात कांदा उत्पादक शेतजाऱ्यांमध्ये नाराजी आहे. उसाच्या बाबत पण नाराजी आहे. इथेनॉल बाबत केंद्राचे धोरण चांगले नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहे. इतर पिकांच्या किमती पण बघितल्या तर शेतकऱ्यांची नाराजी आहे. नाशिकमध्येही कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे. शेतकरी अस्वस्थ दिसतोय. असे शरद पवार म्हणाले.

रोजगार नसल्यानं लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला मोजावी लागेल. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासाठी काही नाही, त्यामुळे विरोधी पक्षांवर वेगळ्या पक्षांवर हल्ला करायची तयारी दिसते. ईडी सीबीआय आणि इतर यंत्रणाचा वापर केला जातोय त्यावरही शरद पवार यांनी टीका केली.

ईडी फक्त विरोधी पक्षासाठी

पवार म्हणाले, संजय राऊत यांना आत टाकले, अनिल देशमुख यांच्याबाबत केस केली. आरोप केले जातात, मात्र त्याच्यात काही दम नाही. मोदी सरकार आल्यावर 121 लोकांची चौकशी केली त्यात 115 हे विरोधी पक्षाचे आहे. ईडी फक्त विरोधी पक्षासाठी वापरली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. ईडी कडून कारवाई झाली त्यात एकही भाजप नेत्यांचा समावेश नाही. ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्यावर कारवाई नाही. जसे हसन मुश्रीम, प्रताप सरनाईक यामिनी जाधव वैगरे …अशी नावे पवारांनी घेतली.

पवार म्हणाले, काँग्रेस सोबत असतांना कधीही आशा कारवाई झाल्या नाही. आम्ही सत्तेचा गैरवापर केला नाही, निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचा गैरवापर केला जातोय.

Back to top button