सोळूच्या लक्ष्मी मेटल कंपनीत डीपीचा भीषण स्फोट | पुढारी

सोळूच्या लक्ष्मी मेटल कंपनीत डीपीचा भीषण स्फोट

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी जवळील सोळू (ता.खेड) येथील लक्ष्मी मेटल कंपनीत विद्युत डीपीचा भीषण स्फोट झाला असून त्या लगतच्या चार ते पाच घरांनामधील गॅस टाकीचा देखील स्पोट झाल्याने आग पसरल्याने सुमारे सात ते आठ लोक भाजले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी आळंदी नगरपरिषद अग्निक्षमण दल व पिंपरी चिंचवड अग्निक्षमण दलाचे बंब दाखल झाले आहेत.आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी असून उपचार कार्य सुरू करण्यात आले आहे.
जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून विद्युत यंत्रणेचा सुरक्षेचा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Back to top button