Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना | पुढारी

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत (Leopard Attack)  वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज मंगळवार, दि.30 रोजी एक ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे.

निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे ही घटना घडली असून येथील रहिवाशी तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या भागात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मीनाक्षी शिवराम झुगरे, वय ३१ असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही तरुणी घराबाहेर पडल्यानंतर बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप (Leopard Attack) मारली. यामध्ये तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. येथील रहिवाशी भागासह बिबट्या असलेल्या तालुक्याच्या सर्व परिसरात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. दुर्दैवी पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी सामजिक कार्यकर्ते सिताराम गावंडा यांच्यासह गावक-यांनी केली आहे. दरम्यान वन विभागाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. (Leopard Attack)

Back to top button