समीर वानखेडे यांना आता शाहरूख खान भिडणार ; हायकोर्टाच्या आदेशानंतर… | पुढारी

समीर वानखेडे यांना आता शाहरूख खान भिडणार ; हायकोर्टाच्या आदेशानंतर...

मुंबई, पुढारी ऑनलाईन

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान याचा सहभाग नसल्याबाबतच्या हायकोर्टाच्या आदेशाची प्रत हाती आल्यानंतर आता एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना शाहरूख खान भिडणार आहे. आदेशाची प्रत हाती आल्यानंतर वानखेडे यांच्याविरोधत कायदेशीर कारवाईसाठी शाहरूख पावले उचलणार असल्याचे त्यांच्या नीकटवर्तीयांनी सांगितले.

आर्यन खान, मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या तिघांना जामीन दिल्यानंतर त्याच्या आदेशाची प्रत हाती आली आहे. ा प्रकरणात वानखेडे यांनी केलेल्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरूख खानने याबाबत एक शब्दही उच्चारला नाही. मात्र, वानखेडे यांनी केलेल्या तपासावर हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

या प्रकरणात वानखेडे यांनी शाहरूख खान याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप झाले. या प्रकरणातील पंच भाजपचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले. तसे यातील किरण गोसावी हा फरार गुन्हेगार असल्याचेही समोर आले. त्यामुळे ही कारवाई वादात सापडली होती. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ एक आरोप करत त्यांचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.

एनसीबीने केलेल्या कारवाईबाबत संशयास्पद गोष्टी बाहेर आल्यानंतर आता एनसीबीने वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतला आहे. तसेच वानखेडे यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. आर्यन खान प्रकरणात आयकोर्टाच्या आदेशाची प्रत हाती आल्यानंतर आर्यन, अरबाझ आणि मूनमून यांच्या विरोधात त्यांनी अमली पदार्थांसाठी कट आखल्याचे कोणेतेही पुरावे नाहीत. याचबरोबर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही. या आरोपींनी समान हेतू ठेवून बेकायदा कृत्य केले नसल्याचा एकही पुरावा कोर्टासमोर एनसीबी मांडू शकले नाही. ते तिघे एका क्रूझमधून प्रवास करीत होते म्हणून त्यांना कट रचत होते असा होत नाही. या तिघांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे केवळ सेलिब्रेटी आहेत म्हणून त्यांना अटक करणे चूक असल्याचे मत नोंदवले होते.
आता हाच आदेश हाती पडल्यानंतर शाहरूख खान वानखेडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत उत्सुक आहे.

हेेही वाचा : 

Back to top button