satara dcc bank result : शशिकांत शिंदेंना शिवेंद्रसिंहराजेंनी सुनावले... | पुढारी

satara dcc bank result : शशिकांत शिंदेंना शिवेंद्रसिंहराजेंनी सुनावले...

सातारा (कुडाळ); पुढारी वृत्तसेवा

ॲक्शन केली तर रिॲक्शन येणारच. म्हणून दुसर्‍यावर पराभवाचे खापर फोडण्यापेक्षा स्वतःच्या चुकांचे आत्मपरीक्षण करा, असा प्रतिटोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्या केलेला आरोपावर लगावला satara dcc bank result .

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर, शशिकांत शिंदे यांनी, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव घेऊन पराभवाबाबत प्रतिक्रिया दिल्या होत्या.

शिंदेंच्या त्या प्रतिक्रियांचा खरपूस समाचार घेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी, शशिकांत शिंदे यांनी, त्यांच्या गाडीतून फिरणाऱ्यांची मते किती ऐकायचीच अथवा त्यांना किती महत्त्व द्यायचे हे ठरवायला हवे.

जावळी तालुक्यातील पुर्वीचे माझे सहकारी ज्ञानदेव रांजणे यांची पत्नी जिल्हा परिषदेसाठी उभ्या होत्या. त्यावेळी आपण राष्ट्रवादीत होतो. तरीही त्यांच्या लोकांनी खूप अडचणी निर्माण केल्या. तरीही त्या प्रकरणावर आम्ही पडदा टाकला.

शशिकांत शिंदे यांनी आपण जावळी तालुक्यात लक्ष घालू असेही वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, जावळी तालुक्यामध्ये कोणीही कितीही लक्ष घातले तरी मला फरक पडणार नाही. माझ्या मतदारसंघात कोणीही ढवळाढवळ केली तर त्याला त्याच पद्धतीनेच उत्तर देण्याचा इशारा भोसले यांनी यावेळी दिला.

.satara dcc bank result : ‘शिवेंद्रराजे कुठल्या पक्षाचे नेते?’

शिवेंद्रराजे हे कोणत्या पक्षातले आहेत हे जिल्ह्यातल्या नेत्यांनी सांगावे. ज्ञानदेव रांजणे हे छोटे कार्यकर्ते आहेत. त्यांचा ‘बोलविता धनी’ वेगळा आहे. जिल्ह्यात मी राष्ट्रवादी पक्ष वाढवत असल्यानं अनेकांना माझा अडसर आहे हे मला माहीत आहे, असं म्हणत, आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. ‘पक्षासाठी मी कुणालाही अंगावर घेतो हा माझा दोष आहे. जावलीची जनता कोणाच्या मागे आहेत हे कळेलच. शिवेंद्रराजे भोसले कोणत्या पक्षात आहेत हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मला एकदा सांगावं, म्हणजे पुढच्या काळात कोणत्या तालुक्यात पक्ष कसा वाढवायचा हे ठरवता येईल,’ असा इशाराही शिंदे यांनी दिला.

जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादीअंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

हे ही वाचा :

Back to top button