चंदगडमधील शेवाळेत टस्कर हत्ती घालतोय धुमाकूळ; पिकांचे नुकसान | पुढारी

चंदगडमधील शेवाळेत टस्कर हत्ती घालतोय धुमाकूळ; पिकांचे नुकसान

चंदगड; पुढारी वृत्तसेवा

ऐन सुगीच्या हंगामात चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात टस्कर हत्ती धुमाकूळ घालत असून कळपातील एका टस्कर हत्ती ने पिकांच्या नुकसानीबरोबच ट्रॅक्टर ट्रॉली उलटवली. तर शेती औजारे, प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली.

शेवाळे येथील पांडूरंग बाळू मळवीकर यांच्या घरासमोर टस्कराने दोन तास धिंगाणा घातला. वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी हत्तीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण हत्तीने त्यांना दाद दिली नाही.्र

दोन तासांच्या प्रयत्नानंतर हत्तीला जंगलात हुसकवण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. त्यानंतर रात्री १० वाजता शेतावरील घराजवळ पुन्हा हत्तींचा कळप आला. त्यावेळी त्यांनी घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रॉली उलटवली. तसेच पिण्याचे पाणी भरलेली टाकी फोडली. पाण्याचा बॅरेलही फोडून टाकला. शेजारील असलेल्या ऊस पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काल रात्री उशिरापर्यंत कळपाचा धुडगूस सुरू होता.

हे ही वाचा :

Back to top button