आमदार नीलेश लंके यांना डॉक्टरेट प्रदान | पुढारी

आमदार नीलेश लंके यांना डॉक्टरेट प्रदान

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात दिलेल्या योगादानाची दखल घेत फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने आमदार नीलेश लंके यांना होरोनरीस कॉसा डॉक्टरेट या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले. गोव्यातील पणजी येथे शनिवारी (दि.20) डॉ. रिपु राजन सिन्हा, डॉ. अरुण ओमिनी, डॉ. प्रियदर्शनी नायक, डॉ. संग्रामसिंह रामराव माळी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीने जगभर थैमान घातल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधितांवरील उपचारासाठी स्वतःला झोकून दिले. आमदार लंके यांच्या या योगदानाची देश-विदेशात दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्माति करण्यात आले. गोव्यातील पणजी येथे पार पडलेल्या या पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी प्रा. संजय लाकूडझोडे, सुदाम पवार, अ‍ॅड. राहुल झावरे, भाऊसाहेब भोगाडे, अनिल गंधाक्ते, कांतीलाल भोसले, अभय नांगरे, दादा दळवी, सुरेश फापाळे, नाथाजी बोरकर, शुभम दाभाडे आदी उपस्थित होते.

Back to top button