गुन्हा दाखल होण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांचं ते ट्वीट चर्चेत  | पुढारी

गुन्हा दाखल होण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांचं ते ट्वीट चर्चेत 

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवारगटासाठी आजचा दिवस बऱ्याच घडामोडींचा ठरला. एकीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामासंदर्भातील विधानामुळे जनमानसात चांगलाच रोष ओढवला. तर दुसरीकडे रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्याच वृत्तही समोर येत आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी येथे बारामती ॲग्रोही कंपनी आहे, आज सकाळी तपास यंत्रणा येथे पोहोचली . सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान हे अधिकारी येथे पोहोचले. रोहित पवार यांना गेल्यावर्षी बारामती अॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यावहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. यानंतर रोहित यांनी बड्या नेत्यांचा हात या संदर्भात असल्याच सूचक विधानही केलं होतं. सकाळपासून बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात येत होता.

ही घडामोड  संपते न संपते तोच श्रीराम यांच्या आहारपद्धतीबाबत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला. पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आव्हाड यांच्याबाबत तक्रार दाखल केली होती. आव्हाड यांच्यावर कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्याच्या काही वेळापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी बारामती ॲग्रोवर पडलेल्या धाडी संदर्भात ट्वीट केलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात,

“@RRPSpeaks यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली.पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे. वाईट याचेच वाटते की,यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत.परंतु मला विश्वास आहे की,रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही,उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल.

Back to top button