रश्मिकानंतर कॅटरिना : Deep Fakeने टायगर ३मधील ‘टॉवेल’ सीनचे आक्षेपार्ह मॉर्फिंग | पुढारी

रश्मिकानंतर कॅटरिना : Deep Fakeने टायगर ३मधील 'टॉवेल' सीनचे आक्षेपार्ह मॉर्फिंग

Katrina Kaif Deep Fake Image | तंत्रज्ञानाचा किळसवाणा गैरवापर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रश्मिका मंधना हिचा मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होऊन एक दिवसही झालेला नाही, तोपर्यंत कॅटरिना कैफचा एक फोटो अश्लिलरीत्या मॉर्फ करण्यात आला आहे. कॅटरिनाच्या आगामी टायगर ३ या सिनेमातील एका दृश्यात हे मॉर्फिंग करण्यात आले आहे. (Katrina Kaif Deep Fake Image)

टायगर ३मध्ये कॅटरिनाने एक अॅक्शन सीन दिला आहे. यात ती टॉवेलमध्ये हॉलिवूड स्टंटवूमनशी हाणामारी करताना दिसते. या सीनची ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच मोठी चर्चा झाली आहे. याच सीनमधील एक फोटो आता मॉर्फ करण्यात आला आहे. मॉर्फ केलेला फोटोतील कॅटरिनाचे कपडे आक्षेपार्ह आणि अश्लिल दाखवण्यात आले आहेत. हे मॉर्फिंग अत्यंत हुबेहुब करण्यात आले आहे.

रश्मिकाच्या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया Katrina Kaif Deep Fake Image

रश्मिका मंधना एक लिफ्टमध्ये प्रवेश करत असल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. पण हा व्हिडिओ रश्मिकाचा नसून तो झारा पटेल या युवतीचा असल्याचे नंतर लक्षात आले. पण झाराच्या व्हिडिओत अतिशय बेमालुमरीत्या रश्मिकाचा चेहरा मॉर्फ करण्यात आला होता. यावर अमिताभ बच्चन यांना कारवाईची मागणी केली. तसेच खुद्द रश्मिकानेही यावर प्रतिक्रिया दिली. “मी जर महाविद्यालयात शिकत असताना हा प्रकार घडला असता तर कसा हाताळला असता, प्रश्न पडला आहे,” असे तिने म्हटले आहे.

Deep Fake म्हणजे काय? Katrina Kaif Deep Fake Image

हा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने रिप्लेस करता येतो. अशा पद्धतीने बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवणे यात फारसे काही नवीन नाही. पण Deep Fake मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय तंतोतंत बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवला जातो. चेहऱ्यावरील अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्यात समन्वय नसणे यातून Deep Fake व्हिडिओ ओळखता येतो.

Back to top button