बीडमधील इंटरनेट सेवा सुरू | पुढारी

बीडमधील इंटरनेट सेवा सुरू

बीड; पुढारी वृत्तसेवा बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक जाळपोळीच्या घटनेनंतर बीड मधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परंतु ती आज (शुक्रवार) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी तसेच इंटरनेट बंदी लागू केली होती. काल (गुरूवार) सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर बीड जिल्ह्यातील आंदोलन थांबले. तसेच परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संबंधीचे पत्रही पाठवले होते. त्यावर आता दुपारी अंमलबजावणी करण्यात आली असून, बीड शहरातील तसेच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button