सांगली: आटपाडी तालुक्यात १ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान

Atpadi
Atpadi

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी आटपाडी तालुक्यात दुपारी एक वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. रणरणत्या ऊनामुळे मतदारांमधील अनुत्साह जाणवत होता. ५० टक्के पर्यंत मतदान होईल, अशी अपेक्षा आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप आणि महायुती मार्फत विद्यमान खासदार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील देखील लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहे.

आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.सकाळी ७ ते ९ या कालावधीत ८ टक्के,सकाळी ९ ते ११ दरम्यान १९ टक्के तर दुपारी १ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. शहरी भागात अधिक तर ग्रामीण भागात कमी मतदान झाले. उन्हाचा तडाखा आणि अनुत्साहामुळे जेमतेम ५० टक्के मतदान होईल, अशी शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडी येथे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, तानाजीराव पाटील, भारत पाटील यांनी आटपाडीत मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news