N Chandrababu Naidu : एन. चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ; AP उच्च न्यायालयाचे आदेश | पुढारी

N Chandrababu Naidu : एन. चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ; AP उच्च न्यायालयाचे आदेश

पुढारी ऑनलाइन डेस्क : N Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे, असे PTI ने म्हटले आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांची एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. एएनआयने याबाबत पोस्ट केली आहे. ७१ कोटी रुपयांच्या आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणी आंध्र प्रदेशच्‍या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्‍यांना शनिवारी (दि. ९) अटक केली होती. त्यानंतर त्यांना एसीबी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

संबंधित बातम्या :

कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरण

आंध्र प्रदेशमध्‍ये २०१४ मध्‍ये बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्‍यासाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळ (APSSDC) स्‍थापन करण्‍यात आले होते. तत्‍कालिन मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्‍या सरकारने हा निर्णय घेतला होता. या महामंडळातमध्‍ये ३७१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्‍याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्‍यावर हे. त्‍यांच्‍याविरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक आदी गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत. आंध्र प्रदेश सीआयडीने त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

त्यानंतर त्यांना विजयवाडा लाचलुचपत प्रतिबंध विभाग न्‍यायालयाने (एसीबी) त्‍यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामध्ये आज आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Back to top button