आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक; भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीची कारवाई | पुढारी

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक; भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना आज पाहाटे (दि.९) गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली. एपी कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. नायडू यांच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातून नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही ताब्यात घेतले आहे.

नंद्याल रेंजचे पोलिस डीआयजी रघुरामी रेड्डी आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने नायडू यांच्या कॅम्प हॉलमध्ये, शहरातील फंक्शन हॉलवर पहाटे ३ च्या सुमारास छापा टाकून त्यांना अटक केली. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेदरम्यान टीडीपी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. समर्थक पोलिसांना नायडू यांच्या वाहनाजवळ येण्यापासून रोखत होते, मात्र सकाळी सहा वाजता पोलिसांनी नायडू यांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढले आणि अटक केली. त्यांना एपी कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे डीआयजी रेड्डी यांनी सांगितले. नायडू यांना वैद्यकीय तपासणीसाठी नंद्याल रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

हेही वाचा : 

Back to top button