पुढारी ऑनलाईन डेस्क : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले तेलगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज ( दि. १०) विजयवाडा 'एसीबी' न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ३७१ कोटी रुपयांच्या आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणी आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना शनिवारी (दि. ९) अटक केली होती.
आंध्र प्रदेशमध्ये २०१४ मध्ये बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळ (APSSDC) स्थापन करण्यात आले होते. तत्कालिन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. या महामंडळातमध्ये ३७१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर हे. त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश सीआयडीने त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे. आज विजयवाडा लाचलुचपत प्रतिबंध विभाग न्यायालयाने (एसीबी) त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
हेही वाचा :