North Tech Symposium 2023 : स्पायडर मॅन सारखे दिसणारे, चार पायांवर चालणारे शस्त्र वाढवणार भारतीय सैन्याची शक्ती (पाहा व्हिडिओ) | पुढारी

North Tech Symposium 2023 : स्पायडर मॅन सारखे दिसणारे, चार पायांवर चालणारे शस्त्र वाढवणार भारतीय सैन्याची शक्ती (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाइन डेस्क : North Tech Symposium 2023 : भारतीय सैन्य स्वतःला अपग्रेड करत आहेत. भविष्यातील ड्रोन वॉर, ड्रोनच्या समस्या तसेच अन्य आव्हाने लक्षात घेता भारतीय सैन्य देखील नवीन प्रकारचे विविध शस्त्र आणि उपकरणे विकसित करत आहेत. जम्मूमधील ‘नॉर्थ टेक सिम्पोजियम 2023’ मध्ये भारतीय सैन्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले मल्टी-युटिलिटी लेग्ज इक्विपमेंट (MULE) ने सर्वांचेच लक्ष वेधले. हे उपकरण दिसायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील स्पायडरमॅन प्रमाणे आहे. म्यूल (MULE) हे एक बहुउद्देशीय उपकरण आहे. यामध्ये अनेक फिचर्स आहेत.

North Tech Symposium 2023 : IIT जम्मूमध्ये तीन दिवसीय ‘नॉर्थटेक सिम्पोजियम 2023’ प्रदर्शन

IIT जम्मूमध्ये सोमवारपासून तीन दिवसीय ‘नॉर्थटेक सिम्पोजियम 2023’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लष्कराच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले अत्याधुनिक ड्रोन, शस्त्रे आणि टेहळणी उपकरणे प्रदर्शित करण्यात आली आहेत. संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या योगदानाची माहिती देण्याबरोबरच भविष्यातील युद्ध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जनजागृतीही करण्यात आली आहे. यावेळी या प्रदर्शनातील ‘MULE’ या चार पायांवर चालणाऱ्या स्वयंचलित उपकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

याचा व्हिडिओ एएनआयने त्याच्या ‘X’ खात्यावर पोस्ट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्पायडरमॅन सारखे दिसणारे हे उपकरण एक प्रकारचे AI रोबोटिक सैन्यच आहे. जे शत्रूच्या सीमेत 10 किमी आत पर्यंत जाऊन लक्ष्य गाठू शकते. AI-आधारित ऑटोनॉमस मल्टी वेपन एंगेजमेंट सिस्टम (अँटी ड्रोन सिस्टम) भारतीय सैन्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

North Tech Symposium 2023 : AI-आधारित ऑटोनॉमस मल्टी वेपन एंगेजमेंट सिस्टम

याविषयी ARC Ventures (12.09) चे R&D अभियंता आर्यन सिंग यांनी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले, त्याची पेलोड क्षमता 12 किलो आहे. थर्मल कॅमेरे, रडार यांसारखे अनेक पेलोड जोडले जाऊ शकतात. फायरिंग प्लॅटफॉर्म देखील त्यात जोडले जाऊ शकतात. एलटीई आणि वाय-फाय दोन्ही बँड वापरण्यात आले आहेत. शॉर्ट रेंजसाठी, वाय-फाय वापरले जाऊ शकते. LTE 10 किमी पर्यंतच्या अंतरासाठी वापरले जाऊ शकते. ते कोणत्याही भूभागात वापरले जाऊ शकते. तसेच भूभागानुसार त्याच्यावरील शस्त्रे बदलता येतील.
सिंग यांच्या माहितीनुसार हे उपकरण 45 डिग्रीपर्यंतच्या पहाडावर चढू शकते. तसे 18 सेंटीमीटर उंचीच्या पायऱ्या देखील चढू शकतो. रिमोट कंट्रोल, वाय-फाय, एलटीई अशा तिन्ही तंत्रज्ञानाद्वारे हे चालू शकते.

North Tech Symposium 2023 : उपकरणाचे तीन मुख्य विभाग – कर्नल मिहीर

लेफ्टनंट कर्नल मिहीर यांनी सांगितले की, “याला 3 भागांमध्ये विभागले आहे. पहिला शस्त्रास्त्रांचा फ्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवर एलएमजी, रायफल आणि कार्बाइन यांसारखी अनेक प्रकारची शस्त्रे बसवता येतात. दुसरा एआय-आधारित लॅपटॉप आणि तिसरा आहे कंट्रोलर बॉक्स. यात मुळात दोन मोड आहेत – स्वायत्त आणि मॅन्युअल. स्वायत्त मोडमध्ये, ते ड्रोन स्वतःच शोधते आणि ट्रॅक करते, ऑपरेटरला लक्ष्य मारण्याची परवानगी देते. हे MCEME (Military College of Electronics and Mechanical Engineering) द्वारे विकसित केले गेले आहे

North Tech Symposium 2023 : भारत संरक्षण उत्पादक देश म्हणून उदयास येईल – CDS जनरल अनिल चौहान

सोमवारी येथे सुरू झालेल्या ‘नॉर्थ टेक सिम्पोजियम’मध्ये स्वदेशी बनावटीच्या संरक्षण प्रणालीचे प्रदर्शन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलला सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी भेट दिली. सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी यावर जोर दिला की देशात अशी यंत्रणा आहे जी 100 किलोमीटरच्या परिघात शस्त्रांना लक्ष्य करू शकते. चौहान म्हणाले की हे लक्ष्य सरावासाठी खरेदी केले गेले नाहीत परंतु “ऑपरेशन दरम्यान” वापरले जातील.

जनरल चौहान म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या “आत्मनिर्भरतेच्या” मार्गावर देश पुढे जात असल्याने भारत हा जगातील प्रमुख संरक्षण उत्पादक देश म्हणून उदयास येईल.

हे ही वाचा :

Back to top button