Ministry of Defense : लक्ष्य आत्मनिर्भर भारत; संरक्षण मंत्रालयाकडून स्वदेशी उपकरणांच्या चौथ्या यादीला मंजुरी | पुढारी

Ministry of Defense : लक्ष्य आत्मनिर्भर भारत; संरक्षण मंत्रालयाकडून स्वदेशी उपकरणांच्या चौथ्या यादीला मंजुरी

पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली; Ministry of Defense: संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त संरक्षण साहित्याची खरेदी देशी बाजारपेठेतून करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यानुसार देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने चौथी ‘इंडिजनायझेशन’ यादी जाहीर केली आहे. संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या 928 उपकरणे व सब-सिस्टीम्सचा समावेश या यादीत आहे. यादीत सामील असलेली उपकरणे व सब-सिस्टीम्सची खरेदी केवळ भारतातून केली जाईल. (Ministry of Defense)
पुढील पाच वर्षात 928 उपकरणे व सब-सिस्टीम्सची आयात टप्पा-टप्प्याने पूर्णपणे थांबविली जाईल, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी जास्तीत जास्त उपकरणे व यंत्रणांची खरेदी देशी बाजारातून केली जात आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत तीन ‘पॉझिटिव्ह इंडिजनायझेशन’ याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. ही उपकरणे व सब- सिस्टीम्स लष्कराचे विविध प्लॅटफॉर्मस तसेच शस्त्रास्तांमध्ये वापरले जातात. Ministry of Defense

हेही वाचा 

Back to top button