आजचे राशिभविष्य (दि. २३ ऑगस्ट २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २३ ऑगस्ट २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकता. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो, हे विसरून चालणार नाही.
वृषभ
वृषभ

वृषभ : व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत, तर वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील.
कर्क
कर्क

कर्क : तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे वैतागून जाल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे; पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.
सिंह
सिंह

सिंह : मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ्रम आणि नैराशेपासून दूर राहा. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे द़ृष्टीपथात येईल.
कन्या
कन्या

कन्या : आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल, असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा.
तुळ
तुळ

तूळ : तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत, तर अतिरिक्त पैसा कमावू शकाल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : संयम, निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे.
राशिभविष्य
धनु

धनु : विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा.
मकर
मकर

मकर : जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल.
कुंभ
कुंभ

कुंभ : जे लोक लघू उद्योग करतात. त्यांना आजच्या दिवशी जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मीन
मीन

मीन : अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते भविष्याची दिशा दाखवतील. मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात.

Back to top button