Love Story : दक्षिण कोरियाच्या ‘किम’ने प्रियकर सुखजीतसाठी भारत गाठले; वाचा दोघांची ‘लव्ह स्टोरी’ | पुढारी

Love Story : दक्षिण कोरियाच्या 'किम'ने प्रियकर सुखजीतसाठी भारत गाठले; वाचा दोघांची 'लव्ह स्टोरी'

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेमासाठी काहीही! सध्या पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतातील सचिन आणि भारतीय अंजू आणि पाकिस्तानी नसरुल्लाह यांच्या प्रेम कहाण्यांच्या बातम्यांनी सोशल मीडिया भरले आहे. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडत असते. सीमा हैदरने अवैध प्रकारे तीन देशांच्या सीमा ओलांडल्या आणि आपल्या भारतीय प्रियकरासोबत राहण्यासाठी ती भारतात आली. तर भारतातील अंजूने पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह साठी पाकिस्तान गाठले. त्यानंतर आता एका भारतीय मुलाच्या प्रेमात पडलेली एक दक्षिण कोरियन मुलगी आपल्या प्रेमाखातर भारतात आली आहे. ती २३ वर्षांची आहे. ती आपल्या भारतीय प्रियकराशी विवाहबद्ध झाली आहे. मात्र, या दोघांची प्रेमकथा सीमा-सचिन आणि अंजू-नसरुल्लाह यांच्यापेक्षा वेगळी आहे. जाणून घेऊया कोरियन-भारतीय प्रेमाची गोष्ट. (Love Story)

Love Story : उत्तरप्रदेश-दक्षिण कोरिया प्रेमाची गोष्ट

मुळचा उत्तरप्रदेशचा आणि शाहजहांपूर येथील रहिवासी असलेला सुखजीत सिंग नोकरीनिमित्त दक्षिण कोरियातील बुसान येथे गेला. तिथे तो एका कॅफेमध्ये नोकरी करु लागला. काही दिवसांनी दक्षिण कोरियाची २३ वर्षीय किम बोह नी ही तिथे नोकरीला लागली. तिथे ती बिलिंग काउंटरवर काम करु लागली. तिथे या दोघांची ओळख झाली. दोघांची हळूहळू डेटिंग सुरू झाली. दरम्यान, सुखजीत सहा महिन्यांसाठी भारतात आपल्या घरी आला. सुखजीत सिंगच्या आठवणीने ती बेचैन झाली. अखेर तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती दिल्लीला रवाना झाली. तेथून ती थेट शाहजहांपूरमधील सुखजीतच्या घरी आली. किमला पाहून सुखजीतही आपला आनंद लपवू शकला नाही.

कोरियामध्ये स्थायिक व्हायचे आहे

दोन दिवसांपूर्वी सुखजीत आणि किम बोह नी दोघांनी गुरुद्वारात लग्नगाठ बांधली. सुखजीत म्हणतो की त्याला त्याच्या पत्नीसोबत कोरियामध्ये स्थायिक व्हायचे आहे. सध्या ती सुखजीतच्या  फार्महाऊसवर राहते. तिथे ती मजेत  आहे. सध्या किम बो नी टुरिस्ट व्हिसावर भारतात आहे. महिनाभरानंतर ती मायदेशी परतणार आहे. सुखजीत तीन महिन्यानंतर दक्षिण कोरियाला जाईल, असे एका वृत्तवाहिनीने नमूद  केले आहे. सुखजीतचे कुटुंबीय या लग्नामुळे प्रचंड खूश आहेत.

किम ने भारतातच रहावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे, पण मुलाचा आनंद त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. दक्षिण कोरियन किम बोह नी हिला भारतीय संस्कृती आणि परंपरा आवडतात.

हेही वाचा 

Back to top button