पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते राज बब्बर विवाहित होते. नादिरा नावाच्या महिलेशी त्यांचं लग्न झालं होतं. एका विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्यानंतर स्मिता पाटीलवर टीकाही झाली. इतकचं नाही तर नादिरा-राज बब्बरचा संसार मोडल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. पण, राज बब्बर आणि स्मिता यांचं प्रेम अतूट होतं. दोघांनी लग्नही केलं. (Smita Patil Love story)आज स्मिता पाटील यांचा स्मृतीदिवस. राज बब्बर आणि स्मिता पाटील हे प्रेमात कसे पडले होते? त्यांच्या खासगी आयुष्यातील काही प्रसंगांना दिलेला हा उजाळा. (Smita Patil Love story)
स्मिता यांचा जन्म १९५५ मध्ये पुण्यात झाला होता. त्यांच्या करिअरमध्ये चित्रपटांबद्दल जितकी चर्चा झाली, तितकं त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं होतं. इंडस्ट्रीत असताना स्मिता यांचं अभिनेते राज बब्बर यांच्याशी अफेअर होतं. राज यांचा विवाह नादिरा जहीर यांच्याशी झाला होता. राज बब्बर विवाहीत असतानाही स्मिता आणि राज यांच्यात नातं निर्माण झालं. राज बब्बर यांच्याप्रमाणेच नादिरा यांनी देखील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून पदवी घेतली होती.
असं म्हटलं जातं की, 'भीगी पलकें' चित्रपटादरम्यान, राज बब्बर आणि स्मिता पाटील प्रेमात अडकले होते. राज बब्बर त्यावेळी स्मितासाठी काहीही करायला तयार होते. ८० दशकात दोघेही एकत्र राहू लागले. काही काळानंतर राज आणि स्मिता यांनी लग्न केलं. नादिराचा संसार मोडल्याचा आरोपही स्मिता यांच्यावर झाला. परंतु, स्मिता यांना त्या गोष्टीचा काही फरक पडला नाही.
स्मिता पाटील आई झाल्या. प्रतीक बब्बरचा जन्म झाला. पहिल्याच मुलाच्या जन्मानंतर स्मिता आजारी राहायच्या. वयाच्या ३१ व्या वर्षी १३ डिसेंबर १९८६ ला त्यांचं निधन झालं.
राज यांना तीन अपत्ये. पहिल्या पत्नीपासून जूही आणि आर्य ही दोन अपत्ये तर स्मिता यांचा प्रतीक बब्बर हा मुलगा. स्मिता यांच्या निधनानंतर राज बब्बर पुन्हा आपल्या पहिली पत्नी नादिराकडे परतले.
स्मिता यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव सुहासिनीप्रमाणे सजवण्यात आलं होतं. मेकअप करण्यात आला होता. त्यांच्या पार्थिवाला मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंतने एका मुलाखतीत सांगितलं होतं, 'स्मिता यांनी मृत्यूनंतर ही इच्छा जाहीर केली होती की, आपल्या मृत्यूनंतर एखाद्या सुहासिनीप्रमाणे आपल्याला तयार करण्यात यावं.'
अधिक वाचा-