Bengaluru Traffic Lovestory : बंगळूरची ट्रॅफिकवाली लवस्टोरी: मैत्री झाली, प्रेम झालं, लग्नही झालं…पण उड्डाणपुलाचं काम अजूनही सुरु | पुढारी

Bengaluru Traffic Lovestory : बंगळूरची ट्रॅफिकवाली लवस्टोरी: मैत्री झाली, प्रेम झालं, लग्नही झालं...पण उड्डाणपुलाचं काम अजूनही सुरु

पुढारी ऑलनलाईन डेस्क : तुम्ही खूप लवस्टोरी वाचल्या, ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण कधी ट्रॅफिकमुळे कोणी प्रेमात पडलं आहे. आणि त्यांच लग्न झालं आहे अशी लव्हस्टोरी कधी ऐकली आहे का? असचं काहीस घडलं आहे बंगळूरमध्ये. (Bengaluru Traffic Lovestory) ट्रॅफिक म्हंटलं कि लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात. खूप कंटाळवाणं आणि त्रासदायक वाटतं. पण हेच ट्रॅफिक एका व्यक्तीसाठी आयुष्य बदलवणारं ठरलं आहे. पाहूया ही ट्रॅफिकवाली लवस्टोरी काय आहे.

Bengaluru Traffic Lovestory : ट्रॅफिकवाली लवस्टोरी 

प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट वेगवेगळी. आपण आपल्या आजुबाजूला अनेक लव्हस्टोरी ऐकतो. काही लवस्टोरींचे साक्षीदारही असतो. अशीच एक लव्हस्टोरीची सुरुवात ही ट्रॅफिकमधून झाली आहे. तुम्ही फक्त कल्पना करा की कोणीतरी ट्रॅफिकमध्ये अडकला आहे आणि या ट्रॅफिकमध्ये एखाद्या व्यक्तीला प्रेम झालं आहे. असचं काहीसं बंगळुरमध्ये झालं आहे. ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांच्या यादीत बंगळूरचे नाव घ्यावचं लागेल. बंगळूरमधील एका व्यक्तीने Reddit वर आपल्या प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्याने लिहलं आहे की तो आपल्या पत्नीला ट्रॅफिकमध्ये कसा भेटला आणि आपण कसं लग्न केले. आता त्यांच लग्न होऊन दोन वर्ष झाले आहे. पुढे तो म्हणतो दोन वर्ष झाली आमच्या लग्नाला पण ट्रॅफिक अजूनही तसचं आहे.

अजूनही उड्डाणपुलाचं काम सुरुच

त्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, मी आणि माझी पत्नी सोनी सिग्नल जवळ भेटलो. मी इथे पूर्ण स्टोरी नाही सांगू शकत. थोडक्यात सांगतो. मी एकेदिवशी माझ्या पत्नीला तिच्या घरी सोडायला गेलो होतो. तेव्हा मी फक्त तिचा मित्र होतो. जवळच असलेल्या इजिपूरा उड्डणपुलाचं काम सुरु होतं. त्यामुळे ट्रॅफिक खूपचं होतं. त्यामुळे आम्ही दोघेही त्रस्त होतो. त्यातचं आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही जवळपास एका ठिकाणी जेवण केलं. त्यानंतर आम्ही जवळपास ३ वर्षे डेट केले. दोन वर्ष झाले आमच्या लग्नाला. पण २.५ किलोमीटरच्या त्या उड्डाणपुलाचं काम अजूनही सुरुच आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सोशल मीडिया युझर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button