Modi Government : केंद्रात लागोपाठ तिसऱ्यांदा मोदी सरकारच सत्तेत येणार; सर्वेक्षणातील अंदाज | पुढारी

Modi Government : केंद्रात लागोपाठ तिसऱ्यांदा मोदी सरकारच सत्तेत येणार; सर्वेक्षणातील अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था, Modi Government : आगामी लोकसभा निवडणुकांत पुन्हा एकदा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार (एनडीए) सत्तेवर येण्याचा अंदाज टाईम्स नाऊ, नवभारत टाईम्स आणि इजीटी यांनी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाले तर मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर लागोपाठ तीन लोकसभा निवडणुका जिंकणारे देशाचे दुसरे पंतप्रधान ठरतील. या सर्वेक्षणानुसार रालोआला २९६ ते ३२६ जागा मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. विरोधी इंडिया आघाडीला १६० ते १९० जागा मिळू शकतात. उर्वरित जागा अन्य पक्षांना मिळण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला स्वातंत्र्यदिनी संबोधित करताना पुन्हा एकदा आपण सत्तेवर येणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले होते. त्यानंतर लगेचच घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात रालोआची सरशी होणार असल्याचे समोर आले आहे.

Modi Government : मोदी यांची विकसित भारत संकल्पना जास्त प्रभावी

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली विकसित भारत ही संकल्पना जास्त प्रभावी ठरत असून त्या तुलनेत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव मर्यादित असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. म्हणजेच पुन्हा एका ‘मोदी मॅजिक’ चा बोलबाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिंदी पट्ट्यात मोदी मॅजिक

आजसुद्धा हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रामुख्याने मोदी मॅजिकचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थानसह मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्येही आहेत. रालोआला सुमारे ८० टक्के मते मिळतील, असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. केवळ या तीन राज्यांत रालोआला ७० ते ८० जागा मिळू शकतात. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांत तीनशे जागा मिळतील, असे ढोबळमनाने म्हटले असले तरी वास्तवात भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला २९६ ते ३२६ पर्यंत जागा मिळू शकतात. लोकसभेत साध्या बहुमतासाठी २७२ जागांची गरज आहे. त्याचा विचार करता रालोआला त्याहून कितीतरी अधिक जागा मिळण्याचे संकेत या सर्वेक्षणाने दिले आहेत.

सर्वेक्षणातील अंदाज

रालोआ : २९६ ते ३२६ इंडिया : १६० ते १९० उर्वरित जागा अन्य पक्ष

Modi Government : इंडियाच्या जागांतही वाढ

विरोधकांच्या इंडिया या आघाडीला कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत चांगले यश मिळू शकते, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. मात्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात विरोधी आघाडीला फार आशा ठेवता येणार नाही. तामिळनाडूत इंडिया आघाडीला ३० ते ३४ जागा मिळू शकतात. तर रालोआला ४ ते ८ जागा मिळू शकतात. कर्नाटकात रालोआला १८ ते २० जागा, तर विरोधी इंडिया आघाडीला ८ ते १० जागा मिळू शकतात. महाराष्ट्र आणि बिहारमध्येही विरोधी आघाडीला चांगले यश मिळू शकते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला दणदणीत यश मिळण्याचे संकेत

हे ही वाचा :

Revolver Prabal | भारताची पहिली लाँग रेंज रिव्हॉल्व्हर ‘प्रबल’ आज होणार लॉन्च, जाणून घ्या काय आहे त्यात खास?

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’ प्रत्येक राज्यात; स्वातंत्र्य दिनापर्यंत ७५ गाड्या सुरू करण्याची मोदी सरकारची योजना

Back to top button