Palghar : पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर : जिल्हाधिकारी गोविंद बोडके | पुढारी

Palghar : पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर : जिल्हाधिकारी गोविंद बोडके

पालघर पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १९ जुलै २०२३ रोजी पालघर जिल्हयाला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचा विचार करता, वसई, पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना १९ जुलै २०२३ रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे. (Palghar)

वसई, पालघर, डहाणू व तलासरी या तालुक्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खासगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक १९ जुलै २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

Palghar : पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल (दि. १९ जुलै )

पावसाची नोंद १८ जुलै २०२३ सकाळी ८ ते १९ जुलै २०२३ सकाळी आठ पर्यंतची आहे.

1)वसई:- 153 मी मी
2)जव्हार:- 30 मी मी
3) विक्रमगड:- 21.50 मी मी
4) मोखाडा:- 16.40 मी मी
5) वाडा :- 21 मी मी
6)डहाणू :- 42 मी मी
7) पालघर:- 83.8 मी मी
8) तलासरी :- 32.50 मी मी
एकूण पाऊस :- 400 मी मी
एकुण सरासरी :- 50 मी मी

हेही वाचा 

Back to top button