रत्‍नागिरी : खेड शहरात पुराचे पाणी; जगबुडी व नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर | पुढारी

रत्‍नागिरी : खेड शहरात पुराचे पाणी; जगबुडी व नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

खेड शहर : पुढारी वृत्तसेवा जगगुडी व नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत सलग वाढ होत आहे. तसेच आज (बुधवार) दुपारी १.०० वाजता नदीला भरतीची वेळ असल्याने मटन मार्केट, सफा मज्जिद, निवाचे तळ साठे मोहल्ला पोत्रिक मोहल्ला, गांधी चौक वालकी गल्ली, गुजर आळी, पानगल्ली, बाजारपेठ, खामतळे, नगरपरिषद परिसर, कान्हेरे चौक, ब्राह्मण आळी व कासाराळी दापोली नाका या भागात पुराचे पाणी आले आहे.

खेड नगरपरिषदेने नागरिकांना व व्यापारी यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे अशा सूचना दिल्या आहेत. पुरात अडकलेल्या नागरीकांची अंगणवाडी व मुकादम हायस्कूल येथे व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास वरील ठिकाणी आपल्या साहित्यासह स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. खेड दापोली मार्गावर सुर्वे इंजीनियरिंग जवळ रस्त्यावर पाणी आले असल्याने दापोली कडील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

खांबतळे येथे मुख्य रस्त्यावर पाच फुट पाणी आले आहे. पुरामुळे आज शहरातील शाळा तसेच बँका व खासगी आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. खारी, सुसेरी, चिंचघर या गावांचा संपर्क तुटला आहे. सुकवली येथील चोरद नदी दुथडी भरून वाहत आहे. नातूनगर धरण क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.

पुरामुळे प्रभावित गावे:

1. बोरघर (कातकरी वस्ती) येथील 4 घरांना पाणी लागले असल्याने 4 घरांतील 22 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे.
2. मौजे भोस्ते गावातील रस्त्यावर जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अलसुरे येथील मजिदीचे भोंग्यावरून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहणेबाबत सुचित केले आहे
3.खेड शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे. तेथील दुकानदार यांनी दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.
4. नारिंगी नदीचे पुराचे पाणी कंन्या शाळा जवळ रस्त्यावर आले असल्याने दापोली खेड रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
5. आंबवली येथील धनगर वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या असून रस्त्यांवर झाड पडले आहे.
6. खारी गावात पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने शेजारील घरात 4 कुटुंबांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
6. खेड खांब तळे येथील झोपड पट्टी मधील नागरिक यांना नगर पालिका बालवाडी येथील शाळेत शिफ्ट केले आहे.
7. जगबुडी नदी बाजूस असलेली झोपडपट्टी मधील लोकांना मुकादम हायस्कूल मध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button