Maharashtra NCP crisis : राष्‍ट्रवादीचा मीच प्रदेशाध्यक्ष : जयंत पाटील | पुढारी

Maharashtra NCP crisis : राष्‍ट्रवादीचा मीच प्रदेशाध्यक्ष : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन :  शरद पवार आमच्याबरोबरच आहेत, असे बंडखाेर म्‍हणत आहेत. तसेच आम्ही राष्ट्रवादीतच आहे असे म्हणून काहीजण संभ्रम पसरवत आहेत; परंतु कराडमध्ये बोलताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणी काही म्हणाले तरी आदरणीय शरद पवार साहेबांच्या आदेशाने राष्‍ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मीच आहे, अशा शब्‍दांमध्‍ये राष्‍ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बंडखाेर गटाला (Maharashtra NCP crisis)  सुनावले.

Maharashtra NCP crisis: शरद पवारांच्‍या महाराष्‍ट्र दाैर्‍याला नाशिकमधून प्रारंभ

माध्‍यमांशी बाेलताना जयंत पाटील म्‍हणाले की, लवकरच शरद पवार महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra NCP crisis) करतील. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात ही नाशिकपासून करतील. त्‍यांचा दौरा लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत शरद पवार प्रदेशाध्‍यक्षपदावरुन  बाजूला हो म्हणत नाहीत तोपर्यंत मी जाणार नाही. प्रफुल पटेलांनी केलेल्या कोणत्याही वक्तव्यावर मी बोलणार नाही, असेही ते म्‍हणाले. (Maharashtra NCP crisis) देणे टाळले.

शिंदे गटाचे काही आमदार नाराज

शिंदे गटाचे काही आमदार नाराज असलेले चित्र असल्याचे निरीक्षण जयंत पाटील यांनी नोंदवले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्या पदावर बोलताना ते म्हणाले, यासंदर्भातील कायदेशीर बाबींचा निर्णय हे सरन्यायाधीश चंद्रचूड घेतील, असे जयंत पाटील (Maharashtra NCP crisis) यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

 

Back to top button