Sharad Pawar : शरद पवारांचे खेड शिवापूरला जोरदार स्वागत | पुढारी

Sharad Pawar : शरद पवारांचे खेड शिवापूरला जोरदार स्वागत

खेड शिवापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे कराडकडे जाताना खेड शिवापूर टोलनाक्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या वेळी घोषणा देण्यात आल्या. साहेब, आम्ही कायम तुमच्यासोबतच आहोत, अशा भावना त्यांच्याजवळ व्यक्त केल्या.

याप्रसंगी अभयसिंह कोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, जितेंद्र कोंडे, नाना धोंडे, संग्राम कोंडे, पोपट कोंडे, उल्हास कोंडे, अविनाश बांडे हवलदार आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आम्ही कालही शरद पवार साहेबांबरोबर होतो, आजही आहे, आणि उद्याही राहू, त्यामुळे पवार साहेब जो निर्णय घेतील त्याचे आम्ही निश्चितच पालन करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे व अभयसिंह कोंडे यांनी सांगितले.

भोर येथे जंगी स्वागत

राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीना अभिवादन करण्यासाठी जात असताना खेड-शिवापूर टोल नाका, भोर-कापूरहोळ महामार्गावर भोर-वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून त्यांचे गुलाबपुष्प देऊन जंगी स्वागत आले. या वेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, मपवारसाहेब हम तुम्हारे साथ है।फ अशा घोषणा दिल्या.

या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष गणेश खुटवड, वेल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरनाना भूरूक, प्रकाश तनपुरे, केतन चव्हाण, मनोज खोपडे, गणेश निगडे, तसेच भोर-वेल्हातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही पदाधिकारी गैरहजर

पवार यांच्या स्वागतासाठी भोर-वेल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी गैरहजर असल्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा होऊ लागली होती. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असल्यामुळे भोर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नक्की कोणत्या राष्ट्रवादी पक्षात जायचे अशी संभ्रमावस्था झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा

कोपरगाव : ‘तो’ फुलवितो वाचनातून चैतन्य..!

Shah Rukh Khan | किंग खानचा अमेरिकेत शूटिंग दरम्यान अपघात, करावी लागली शस्त्रक्रिया

टाकळीभान : रात्रीतून अनेक ठिकाणी चोर्‍या; मंदिराची दानपेटी फोडली

Back to top button