जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच | पुढारी

जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरुवार (दि. २२) सकाळी भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर फाट्याजवळ करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे परीसरातील शेतकऱ्याने तक्रार दाखल केली आहे. या शेतकर्‍याच्या शेतातील विहिरीवरील वीज पंप चोरीला गेल्यानंतर त्याने दुसऱ्या शेतकऱ्याविरोधात तक्रार दिली  होती. कुर्‍हे बीटचे हवालदार गणेश पोपटराव गव्हाळे यांनी तक्रारदार असलेल्या शेतकर्‍याशी संवाद साधून संबंधित शेतकर्‍यांचा तुमच्यावर मोटार चोरीचा आरोप असून प्रकरण मिटवण्यासाठी मला एक हजारांची व मोटार चोरीपोटी पाच हजार रुपये संबंधिताना देण्याची मागणी केली. मात्र तक्रारदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. पोलीस हवालदार गव्हाळे यांनी गुरुवार (२२ जून) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी मांडवा फाट्यावर बोलावले. शेतकर्‍याकडून सहा हजारांची लाच घेताच दबा धरून असलेल्या पथकाने गव्हाळे यांना रंगेहाथ अटक केली आहे.

Back to top button