Chinese influencer dies : वजन कमी करून इन्स्पायरच्या नादात चीनमधील सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने गमवला जीव | पुढारी

Chinese influencer dies : वजन कमी करून इन्स्पायरच्या नादात चीनमधील सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने गमवला जीव

पुढारी ऑनलाईन: चीनमधील एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला वजन कमी करण्याच्या प्रयत्नात स्वत: चा जीव गमवावा लागला आहे. तिने तिच्या फॉलोअर्संना प्रेरणा देण्यासाठी वजन कमी करण्याच्या उद्देशाने वायव्य चीनमधील एका शिबिरात सहभाग घेतला होता. परंतु सध्याच्या वजनाच्या निम्मे वजन करून तिच्या चाहत्यांना प्रेरणा (Chinese influencer dies) देण्याच्या नादात मात्र या सोशल मीडिया इन्फ्यूएन्सरला तिचा जीव गमवावा लागला आहे.

चीनमधील या सोशल मीडिया इन्फ्यूएन्सरला शिबिरीत सहभागी होत १०० किलो वजन कमी करायचे होते. यातून तिला तिच्या फॉलोअर्संना प्रेरणा द्यायची (Chinese influencer dies) होती. परंतु, असा अशक्य प्रयत्न करण्याच्या नादी तिचा अचानक मृत्यू झाला. या घटनेनंतर चीनमधील राज्य मीडियाने इन्फ्लुएंसर मीडियाच्या तपासणी सुरू केली असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

मृत कुइहुआ ही चीनधील सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करत होती. तिने टिकटॉकच्या माध्यमातून वजन कमी करण्यासाठी सराव करतानाचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. तिचे वजन १५६ किलोग्रॅम होते, ते ती १०० किलोग्रॅम करण्यासाठी प्रयत्न करत होती. पण वजन कमी करण्याच्या नादात आणि चाहत्यांना प्रेरणा देण्याच्या नादात मात्र तिला जीव (Chinese influencer dies) गमवावा लागला आहे.

दरम्यान काही आठवड्यांपूर्वी एका तरूणाने स्ट्राँग दारूच्या अनेक बाटल्या समोर ठेवत दारू पित असल्याचे लाइव्ह-स्ट्रीमिंग केले होते. यामध्ये या तरूणाचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा:

Back to top button