नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दसक – पंचकच्या दशरथ घाटाची दखल | पुढारी

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दसक - पंचकच्या दशरथ घाटाची दखल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेलरोड परिसरातील दसक – पंचक गोदावरी नदी पात्रातील दशरथ घाट आणि २१ फूट हनुमान मूर्तीच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांना आहे.

याप्रश्नी शिवसेनेचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबुराव आढाव यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना दसक – पंचक गोदावरी नदी पात्र दशरथ घाट येथील सुशोभीकरण करण्याच्या प्रश्नी लक्ष पुरविण्याची विनंती केली होती. आढाव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, दसक पंचक येथील दशरथ घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. दसक आणि पंचक गोदावरी नदीवर राजा दशरथाचा दशक्रिया आणि पंचक्रिया विधी झाल्याचा उल्लेख कथा, पुराणात आहे. त्यामुळे या भागाला धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे. येथे २१ फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. भाविकांना दर्शनासाठी छोटा करून देत दशरथ घाटावर मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

बाबुराव आढाव www.pudhari.news

गेल्या अनेक दिवसांपासून येथील दशरथ घाटाचा विस्तार अन विकास व्हावा, तसेच २१ फूट हनुमान मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांना छोटा पूल तयार करून येथील सुशोभीकरण करावे. अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र महापालिका प्रशासनाने योग्य ती दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याविषयी निवेदन दिले. त्यांनी दखल घेऊन अधिकारी वर्गाला योग्य त्या सुचना केलेल्या आहेत. – बाबुराव आढाव, अध्यक्ष नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ.

हेही वाचा:

Back to top button