पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना बाहेर काढणाऱ्या ‘त्या’ शाळेसमोर मनसेचे आंदोलन | पुढारी

पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना बाहेर काढणाऱ्या 'त्या' शाळेसमोर मनसेचे आंदोलन

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  राजगुरूनगर शहरातील खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के टी ई एस इंग्रजी माध्यम शाळेत पहिल्याच दिवशी फी भरली नाही, म्हणुन विद्यार्थ्याना वर्गाबाहेर काढण्यात आल्याची खळळजनक घटना घडली होती. गुरूवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. १६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करीत आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनात पालक देखील मोठया संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्याना वर्गाबाहेर काढण्याचा निर्णय लादणाऱ्या संस्थेच्या संचालिका तथा शाळा समिती व्यवस्थापन प्रमुख डॉ. माणिक बीचकर यांचा संचालक मंडळाने राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शाळेच्या विवीध अटी, शर्तिबाबत यावेळी अनेक पालकांनी आपल्या भावनिक प्रतिक्रीया व्यक्त केल्या. मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, कामगार सेनेचे मनोज खराबी, अभय वाडेकर, नितीन ताठे, सोपान डुंबरे, मंगेश सावंत, प्रफुल ताये आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गुजराथी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. अनुचित प्रकार घडू नये म्हणुन आंदोलन स्थळी पोलिसांची उपस्थिती होती.

हे ही वाचा : 

धक्कादायक ! पहिल्याच दिवशी फी साठी विद्यार्थ्यांना हाकलले शाळेबाहेर

नगरकरांना फसविणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

Back to top button