Operation Kaveri: ‘ऑपरेशन कावेरी’च्या माध्यमातून आत्तापर्यंत ३ हजार ८६२ भारतीय सुखरूप मायदेशी परतले | पुढारी

Operation Kaveri: 'ऑपरेशन कावेरी'च्या माध्यमातून आत्तापर्यंत ३ हजार ८६२ भारतीय सुखरूप मायदेशी परतले

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुदानधील सत्तासंघर्षात हजारो भारतीय अडकले होते. या भारतीयांना सुदानमधून बाहेर काढण्यासाठी भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाकडून ऑपरेशन कावेरी हे मिशन राबवण्यात आले. या मिशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३ हजार ८६२ भारतीय मायदेशी सुखरूखपणे आणण्यात भारतीय प्रशासनाला (Operation Kaveri)  यश आले आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ट्विटरवरून आज (दि.०५) दिली आहे.

डॉ. एस जयशंकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, परदेशातील सर्व भारतीयांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित (Operation Kaveri) करण्याची प्रेरणा आम्हाला पीएम मोदी यांच्याकडून मिळाली. ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. आत्तापर्यंत भारतीय वायुसेनेची १७ उड्डाणे आणि ५ भारतीय नौदल जहाजांच्या माध्यमातून भारतीयांना सुरक्षितपणे आणण्यात आले आहे. तसेच ८६ भारतीय नागरिकांना सुदानच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधून बाहेर काढण्यात आले आहे, परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ट्विटमधून स्पष्ट केले आहे.

सौदीमधील जेद्दाह येथून हवाई दल आणि व्यावसायिक विमानांनी भारतीयांना परत मायदेशी त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले आहे. यासाठी या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व भारतीय दलांचे, सौदी अरेबियातील प्रशासनाचे प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मदत केल्याबद्दल परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सर्वांचे आभार (Operation Kaveri) मानले आहोत.

हेही वाचा:

Back to top button