Sudan clashes: ऑपरेशन कावेरी; सुदानमधून भारतीयांची पहिली तुकडी मायदेशी रवाना | पुढारी

Sudan clashes: ऑपरेशन कावेरी; सुदानमधून भारतीयांची पहिली तुकडी मायदेशी रवाना

पुढारी ऑनलाईन: सुदानमध्ये सत्तेसाठी जोरदार युद्ध सुरू आहे. येथील सैन्य दल आणि निमलष्करी गटात संघर्ष सुरू आहे. या दरम्यान सुदानमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. येथील संघर्षात (Sudan clashes) अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन कावेरी राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आज (दि.२५) २८७ जणांची पहिली तुकडी भारतात येण्यासाठी रवाना झाली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्विटरवरून दिली आहे.

सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट ग्रुप’ (आर.एस.एफ.) या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दगालो या दोन ताकदवान नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष (Sudan clashes) पेटला आहे. या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर केंद्र सरकारकडून ऑपरेशन कावेरी राबवण्यात आले. या अंतर्गत  भारतीयांच्या पहिली तुकडी सुदानमधून निघाली आहे. भारतीयांच्या एका गटाला घेऊन INS सुमेधा ही नौका जेद्दाह पोर्टमधून (सुदान)  निघाली असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

सोमवारी (दि.२५) कोची येथे युवाम कॉन्क्लेव्हला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, “सुदानमध्‍ये अडकलेल्‍या (Sudan clashes) भारतीयांना मायदेशात सुखरूप आणण्यासाठी आम्ही ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) सुरू केले आहे. हे ऑपरेशन केरळचे सुपुत्र आणि आमच्या सरकारमधील मंत्री मुरलीधरन यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

Sudan clashes: ‘ऑपरेशन कावेरी’ नाव का दिले?

कावेरी ही कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमधून वाहणाऱ्या प्रमुख भारतीय नद्यांपैकी एक आहे. नदी प्रदेशातील लोकांसाठी पवित्र मानली जाते आणि देवी कावर्यम्मा (माता कावेरी) म्हणून पूजली जाते. सुदानमधील निर्वासन मोहिमेला ‘ऑपरेशन कावेरी’ नाव देण्यात आले याबद्दल सुत्रांनी सांगितले की,  अडथळे असूनही नद्या त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतात. ती आपल्या मुलांना सुखरूप परत आणेल, याची खात्री करून देणाऱ्या आईसारखी असते. म्‍हणूनच सुदानमधील ऑपरेशनला कावेरी असे नाव देण्‍यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button